Skip to content

चेहरा उजळ आणि चमकदार करण्यासाठी वापरून बघा हे घरगुती उपाय: Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay

चेहरा उजळण्यासाठी 6 बेस्ट घरगुती उपाय

Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay
Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay


या Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay करून चेहरा कायमचा गोरा बनवायचा आसल तर, तर मग हा लेख पूर्णपणे वाचून वापरण्यात आना. भरपूर मुली चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम, फेशियल किट, स्किन केयर रुटीन, ब्लीच ला प्राधान्य देतात कारण की फेशियलमुळे चेहऱ्यावर चमक येते पन प्रत्येकजण फेशियल करू शकत नाही कारण फेशियल हे महागडे काम आहे. या मध्ये पैसे जास्त खर्च होतात, त्यामुळे आपले बजेट लक्षात घेऊन आज तुम्ही आमच्या ह्या चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत जेणे करून कमी खर्चात तुमचं काम झालं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया. त्याच सोबत चेहरा गोरा होण्यासाठी कोणती क्रीम वापरावी हे पन जाणून घ्या.

चेहरा उजळ आणि चमकदार करण्यासाठी वापरून बघा हे घरगुती उपाय

1. चेहरा गोरा दिसण्यासाठी कोरफड चे फायदे

Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay
Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay


कोरफडामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ, मॉइश्चरायझिंग गुणधर्माचा समावेश आहे, जो अमृतापेक्षा कमी नाही आहे, जो त्वचा चमकदार, आणि गोरी बनवण्यासाठी मदत करतो, म्हणून जर तुम्हाला कोरफडाने चेहरा सुंदर करायचा असेल तर ह्याचा फेस पॅक म्हणून वापर करा. कोरफडाच्या मदतीने चेहरा गोरा करण्यासाठी फेस पॅक बनवावा लागेल, हे करण्यासाठी 2 चमचे कोरफड, अर्धा चमचा मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. हा पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा, चेहरा गोरा करण्यासाठी हा एक चांगला फेस पॅक आहे.

2. चेहरा गोरा दिसण्यासाठी पपई चे फायदे

चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय


पपईमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, ते आपल्या त्वचेवरील म्हातारपणाचा प्रभाव कमी करते, आणि तरुण दिसण्यास मदत करते. त्याच सोबत त्वचेला मॉइश्चरायझ करते, सौंदर्य वाढवण्यास आणि रंग साफ करण्यास मदत करते.जर तुम्हाला सौंदर्य वाढवण्यासाठी पपईचा वापर करायचा असेल तर त्यासाठी 2 चमचे पिकलेल्या पपईच्या लगध्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळा. अश्या प्रकारे तुंही फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर देखील लावा आणि कोरडं होईपर्यंत सोडून द्या आणि चेहरा कोरडा झाल्यावर साध्या पाण्याने धुवा. पपई त्वचेचा रंग उजळवते आणि अतिरिक्त तेल काढून टाकते.

3. चेहरा गोरा दिसण्यासाठी हळद आणि कोरफड चे फायदे

Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay
Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay


हळद आणि कोरफड हे दोन्ही एकत्र मिसळून लावणे चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेशी संबधित अनेक समस्या दूर होतात. पिंपल्स, डाग, डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी खूप उपयोगी आहे. कोरफड त्वचेला हायड्रेशन देण्याचं काम करते आणि हळद चेहऱ्याला ताज ठेवते, म्हणून 1 चमचा ताज्या कोरफड जेलमध्ये चिमूटभर हळद मिसळा आणि काफी काळ त्या पेस्टने चेहऱ्याची मालिश करा. ह्याचे त्वचेसाठी खूप फायदे आहेत.

4. चेहरा गोरा दिसण्यासाठी कॉफी चे फायदे

चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय


कॉफी चेहरा स्वच्छ करतो आणि पिंपल्स काढून टाकते. डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर ते पण दूर होण्यासाठी मदत मिळते. कॉफीचा फेस पॅक तेलकट त्वचा आणि कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. 1 चमचा कॉफीमध्ये 1 चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा, तुमचा कॉफी फेस पॅक तयार होईल.

5. चेहरा गोरा दिसण्यासाठी मुलतानी माती चे फायदे

Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay
Chehra Gora Disnyasathi Gharguti Upay


2 चमचे मुलतानी माती, अर्धा चमचा संत्रा पावडर, चिमूटभर हळद आणि गुलाबजल मिस्क करून एक पेस्ट तयार करा आणि तो पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. हा फेस पॅक त्वचा गोरी, आणि चमकदार करते हा फेस पॅक अँटीएजिंग गुणधर्मानी परिपूर्ण आहे. हे तुमच्या चेहऱ्याला साफ करून चेहरा गोरा करण्यासाठी मदत करते.

6. चेहरा गोरा दिसण्यासाठी गुलाब पाणी चे फायदे

चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय


दररोज चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा, यामुळे त्वचेचा रंग हल्का होण्यास मदत होईल आणि छिद्र देखील आतून स्वच्छ होतील. हा चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय केल्यावर तुम्हाला गुलाब पाण्याचे फायदे जाणून तुम्हाला नवल वाटल.

चेहरा गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *